Biography of swami vivekananda in marathi
स्वामी विवेकानंद यांची माहिती व mentor vivekananda information in marathi | स्वामी विवेकानंद आत्मचरित्र pdf मराठी | स्वामी विवेकानंद यांचे कार्य | swami vivekananda in marathi |swami vivekananda intelligence in marathi
स्वामी विवेकानंद चरित्र मराठी माहिती | Information about maharishi vivekananda in Marathi
swami vivekananda block marathi : एका युवा संन्यासाच्या रुपाने भारतीय संस्कृतीला विदेशात पसरवणारे महान संत स्वामी विवेकानंद..!
विवेकानंदांनी राम कृष्ण मठाची स्थापना करून भारतासह संपूर्ण जगातील मानव समाजाला महत्वपूर्ण संदेश दिला, त्यांनी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने पाश्चात्य संस्कृतीला भारतीय समाज आणि संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. आज आपण स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जीवन परिचय त्यांच्या जीवनातील प्रसंग व biography of mahatma vivekananda in marathi मिळवणार आहोत.
प्रारंभिक जीवन
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकत्यात झाला.
स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील प्रसिद्ध वकील होते व ते पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित होते. विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचाराची महिला होती. त्यांच्या आईचा अधिकांश वेळ भगवान शंकराची पूजा करण्यात जायचा. नरेंद्रनाथ यांची बुद्धी लहानपणापासूनच तेज होती.
परमेश्वराला मिळविण्याची लालसा त्यांच्यात लहानपणापासूनच निर्माण झाली.
नरेंद्र आपल्या आई सोबत नियमित पूजापाठ करत असत. त्यांच्या आई त्यांना रामायण महाभारत मधील पौराणिक कथा सांगत असत. आईमुळे त्यांच्या घरातील वातावरण अध्यात्मिक व पवित्र असायचे.
वाचा> स्वामी विवेकानंद जयंती भाषण
शिक्षण
सन 1871 मध्ये आठ वर्षाच्या वयात नरेंद्रनाथ यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर मेट्रोपोलिटिअन संस्था मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
प्राथमिक शिक्षण मिळवल्यानंतर जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मधून त्यांनी No part आणि BA परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्वज्ञान हा विषय त्यांच्या आवडता विषय होता. यामुळे परमेश्वर आहे का? परमेश्वर असेल तर मग तो कसा असेल? असे देवाविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असत.
स्वामी रामकृष्ण परमहंस यांची भेट
स्वामी विवेकानंद यांचे परमेश्वरा विषयीयीचे कुतूहल पाहून त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी श्रीरामकृष्णाची भेट घेण्याचे सुचवले.
यानंतर एक दिवस नरेंद्र श्रीरामकृष्णांच्या भेटीसाठी दक्षिणेश्वराला जाऊन पोहोचले. त्यांनी सरळ जाऊन श्रीरामकृष्णांना प्रश्न केला की "आपण ईश्वर बघितला आहे का?"
नरेंद्रनाथांच्या या प्रश्नावर श्रीरामकृष्णी सांगितले की त्यांनी ईश्वर बघितला आहे आणि नरेंद्रची इच्छा असेल तर त्यालाही ते ईश्वर दर्शन घडवू शकतात.
श्रीरामकृष्णाची सरलता आणि ईश्वरी अनुराग पाहून नरेंद्र प्रभावित झाले. नरेंद्र आजवर जितक्या माणसांना भेटले होते त्यात फक्त श्रीरामकृष्णांनी स्वतःला जिंकले होते. नरेंद्र यांनी श्रीरामकृष्णाना आपला गुरु म्हणून स्वीकार केले.
याच्या काही वर्षानंतर 1886 साली श्रीरामकृष्णांचे घशाच्या कर्करोगाने निधन झाले.
रामकृष्ण मठाची स्थापना
श्रीराम कृष्णांच्या मृत्यूनंतर नरेंद्रनाथ यांनी वराहनगर मध्ये रामकृष्ण संघाची स्थापना केली.
नंतरच्या काळात या संघाचे नाव रामकृष्ण मठ करण्यात आले. रामकृष्ण मठाच्या स्थापनेनंतर नरेंद्र यांनी ब्रह्मचर्य धारण केले व ते संन्यासी बनले.
स्वामी विवेकानंद भारत भ्रमण
नंतरच्या काळात मात्र 25 वर्षाच्या वयात विवेकानंदांनी संन्यास धारण करून व भगवेकपडे घालून भारतभ्रमण केले. आपल्या पायदळ यात्रेदरम्यान त्यांनी आयोध्या, वाराणसी, आग्रा, वृंदावन, अल्वर अशा धार्मिक स्थळांना भेट दिली.
23 डिसेंबर 892 ला स्वामी विवेकानंद भारत-भ्रमण पूर्ण करून कन्याकुमारी ला पोहोचले. याठिकाणी त्यांनी तीन दिवसांपर्यंत गंभीर समाधीत ध्यान केले.
स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये
सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो मध्ये विश्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. या काळात मद्रास मधील काही तरुणांनी स्वामीजींना या संमेलनात सहभागी होण्यास सांगितले.
या कार्यासाठी मद्रासमधील तरुणांनी धनराशी गोळा करून स्वामीजींना दिली. यानंतर स्वामी विवेकानंद अमेरिका पोहोचले. अमेरिका व युरोपमधील लोक त्या काळात स्वामीजीना हिन भावनेमुळे पाहत असत व यामुळेच त्यांनी स्वामीजींना भाषण देण्यासाठी वेळ दिला नाही. परंतु एका प्रोफेसरच्या प्रयत्नामुळे त्यांना काही वेळ बोलण्याची संधी देण्यात आले. या नंतर स्वामी विवेकानंदांनी 10 मिनिटे आपले अजरामर भाषण दिले.
त्या भाषणातील काही महत्त्वाचा भाग पुढीलप्रमाणे आहे.
स्वामी विवेकानंद शिकागो मधील भाषण - Swami Vivekananda Metropolis marathi speech
1) अमेरिकेच्या सर्व भाऊ बहिणींनो, आजच्या या समारंभात आपण सर्वांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले ते पाहून माझे मन भरून आले. मी जगातील सर्वात जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची जननी कळून तुम्हाला धन्यवाद करतो.
सर्व जाती व पंथांच्या लाखो करोडो हिंदूंकडून तुमचे आभार व्यक्त करतो.
2) मी या रंगमंचावर बोलणाऱ्या काही वक्त्यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी आज हे सिद्ध केले की जगात सहनशीलता पूर्वेकडील देशांकडून पसरत आहे.
3) मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या धर्मातून आहे ज्याने जगाला सहिष्णुता व वैश्विक स्विकृतीचा धडा शिकवला आहे. आम्ही फक्त वैश्विक सहनशीलतेवर विश्वास करीत नाही तर सर्व धर्मांना सत्य व एक मानतो.
4) मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या देशाचा रहिवासी आहे ज्याने त्या सर्व लोकांना आश्रय दिला ज्यांना इतर सर्व देशांनी त्रास दिला. मला अभिमान आहे की आमच्या देशाने इतरांद्वारे प्रताडीत झालेल्या इस्रायली यहुदीनां आश्रय दिला.
5) मला अभिमान आहे की मी त्या धर्माचा नाही ज्याने पारशी लोकांना शरण दिली व अजुनही देत आहे.
6) आजच्या या शुभमुहूर्तावर मला लहानपणी वाचलेला एक श्लोक आठवण येत आहे.
या श्लोकाची करोड लोक पुनरावृत्ती करतात. स्वामी विवेकानंद यांच्या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे होता. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या नद्या एक होऊन समुद्राला मिळून जातात. त्याचपद्धतीने मनुष्य आपल्या इच्छा मधून वेगवेगळे मार्ग निवडतो जरी दिसण्यात हे मार्ग वेगवेगळे वाटत असले तरी ते सर्व ईश्वराकडे जाणारे आहेत.
7) सांप्रदायिकता, कट्टरता आणि धार्मिक हठाने दीर्घ काळापासून या धरतीला जकडून ठेवले आहे. ज्यामुळे आपली धरती हिंसा व रक्ताने लाल झाली आहे. धार्मिक कट्टरतेमुळे कितीतरी सभ्यता व देश नष्ट झाले आहेत.
8) जर कट्टरता पसरवणारे हे राक्षस आजच्या समाजात नसते तर तर मानव समाज कितीतरी चांगला राहिला असता. परंतु आता ही कट्टरता अधिक वेळ राहणार नाही.
मला आशा आहे की या संमेलनाचे बिगुल सर्व तऱ्हेची कट्टरता, धार्मिक हठ आणि दुःखाचा विनाश करेल. मग ते तलवाराने असो वा पेनाने.
स्वामी विवेकानंद द्वितीय विदेश यात्रा
स्वामी विवेकानंद आपल्या दुसऱ्या विदेश यात्रेसाठी 20 जून 1899 मध्ये परत एकदा अमेरिका गेले. या यात्रेत त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये शांती आश्रम व सँन फ्रान्सीस्को आणि न्यूयॉर्क मध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली.
जुलै 1900 मध्ये स्वामी विवेकानंद पॅरिस गेले.
जेथे ते काँग्रेस ऑफ द हिस्टरी रिलीज मध्ये शामील झाले. या नंतर ते भारतात परत आले. 1901 मध्ये त्यांनी बोधगया आणि वाराणसी मध्ये तीर्थयात्रा केल्यात. या दरम्यान त्याची ताब्यात खराब होत होती. अस्थमा व डायबिटीस सारखे रोग त्यांना जडले.
स्वामी विवेकानंद मृत्यू
4 जुलै 1902 ला 39 वर्षाच्या वयात स्वामी विवेकानंदानी आपला शेवटचा श्वास घेतला, त्या काळात ते बेलूर मठात होते.
स्वामाजिनी आपल्या महासमाधीची भविष्यवाणी आपल्या शिष्यांना आधीच सांगून दिली होती.
स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी विचारांनी ओतप्रोत महान संत आणि विचारक होते. त्यांनी आपल्या कार्यातून भारतीयच नव्हे तर युरोप व जगातील अनेक देशासमोर आदर्श मांडला. आज जगभरात स्वामीजीच्या विचारांनी प्रभावित अनेक लोक सत्याचे दर्शन करीत आहेत.
माझी इच्छा आहे की आपण सर्वानी स्वामी विवेकानंदांचे विचार वाचून व आत्मसात करून आपल्या जीवनात ठरवलेले ध्येय प्राप्त करावे. मित्रानो तुम्हाला ही Swami Vivekananda Information heritage Marathi म्हणजेच swami vivekananda marathi mahiti कशी वाटली आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. आपणास स्वामी विवेकानंद आत्मचरित्र pdf मराठी ही पुढे मिळून जाईल.
लेख लिहिताना काही चूक झाली असल्यास ते देखील लिहून पाठवा.
स्वामी विवेकानंद आत्मचरित्र pdf मराठी
स्वामी विवेकानंद यांचे आत्मचरित्र आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात. स्वामी विवेकानंद आत्मचरित्र pdf डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटणाचा उपयोग करावा.
Download Sage Vivekananda Information Marathi PDF
महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे
1) स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय होते?
उत्तर: स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव "नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त" असे होते.
लहानपणी सर्वजण त्यांना नरेंद्र म्हणून संबोधित असत.
2) स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?
उत्तर: स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस हे होते. श्रीरामकृष्णाची सरलता आणि ईश्वरी अनुराग पाहून नरेंद्र प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यांनी श्रीरामकृष्णाचा गुरु म्हणून स्वीकार केला.
3) स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर: स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला पश्चिम बंगालच्या कोलकत्यात झाला
अजून वाचा
Tags:जीवन चरित्र
थोडे नवीन जरा जुने
").addClass("theiaStickySidebar").append(en()),(Sidebar)}Bottom=parseInt(("margin-bottom")),gTop=parseInt(("padding-top")),gBottom=parseInt(("padding-bottom"));var n=().top,s=eight();function d(){crollTop=0,({"min-height":"1px"}),({position:"static",width:"",transform:"none"})}("padding-top",1),("padding-bottom",1),n-=().top,s=eight()-s-n,0==n?(("padding-top",0),SidebarPaddingTop=0):SidebarPaddingTop=1,0==s?(("padding-bottom",0),SidebarPaddingBottom=0):SidebarPaddingBottom=1,usScrollTop=null,crollTop=0,d(),ll=function(e){if((":visible"))if(i("body").width()